सुराय येथे माती परीक्षण नमुना निवड प्रात्यक्षिक
![]()

सुराय येथे माती परीक्षण नमुना निवड प्रात्यक्षिक
सुराय – तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे रिलायन्स फाउंडेशन व कृषी विभाग यांचे संयुक्त विदयमाने या गावी माती नमुना निवड प्रात्यक्षिक व मोफत माती परीक्षण कार्यशाळा घेण्यात आली,या कार्यशाळेमध्ये सुरवातीला शेतकरी बांधवांना माती का तपासावी ,कशासाठी तपासावी आणि त्याचा शेतीला काय फायदा आहे तसेच माती नमुना कसा घ्यायचा,शेतातील कुठल्या ठिकाणचा घ्यायचा त्याचे नियम काय आहे यावर सविस्तर मार्गदर्शन कृषी विभाग चे कृषी सहाय्यक यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले त्या नंतर शेतकरी यांनी सांगितलेल्या नियमानुसार आपले आपले माती चे नमुने आणून दिले .
त्या माती नमुना तपासणी साठी आर. सी. एफ कंपनी च्या माती परिक्षण प्रयोगशाळा मध्ये पाठविण्यात आले. सदर कार्यशाळेत शेतकरी बांधवानी उस्फुर्त प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक नितीन कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. सुराय गावातील शेतकरी बांधवांनी परिश्रम घेतले.

