६ जून रोजी विम्याची रक्कम मिळावी म्हणून कोरोनामुळे मृत्यु झालेल्या मंगला पाटील(अंगणवाडी मदतनीस) यांच्या आईसह कुटुंब आणि संघटना प्रतिनिधींचे जि.प.समोर उपोषण
![]()
६ जून रोजी विम्याची रक्कम मिळावी म्हणून कोरोनामुळे मृत्यु झालेल्या मंगला पाटील(अंगणवाडी मदतनीस) यांच्या आईसह कुटुंब आणि संघटना प्रतिनिधींचे जि.प.समोर उपोषण
अमळनेर प्रतिनिधी
कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडी कर्मचारी यांनी काम करत होत्या. याची दखल घेत शासनाने या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच लागू केले होते.
कोरोनाचे काम करत असताना पाचोरा प्रकल्पातील वरखेडी येथे मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती मंगला गणपत पाटील यांचा कोरोना संसर्ग होवून मृत्यू झाला.
त्यांचा विमा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केला असता त्यात काही त्रुटी निघाल्या आहेत सदर त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जि.प.च्या महिला बालविकास विभागाने दि.१६ जून २०२३ रोजी प्रकल्प कार्यालयाला पत्र दिले आहे.परंतु प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी श्री.दिनेश पाटील आणि प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती जिजा राठोड यांच्या कामकुचार व हलगर्जीपणा मुळे सदरच्या त्रुटींची वर्षभरात ही पूर्तता झालेली नाही.परिणामी मयत मंगल पाटील यांच्या वारसांना आजपर्यंत विमा रक्कम मिळाली नाही.
पाचोरा प्रकल्पात नव्याने कामावर रुजू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती आज पर्यंत PFMS मध्ये अद्यावत न केल्यामुळे सदर मदतनीस सुमारे वर्षभर मानधनापासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
तसेच बहुसंख्य अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना सन २०२३-२०२४ ची गणवेश रक्कम, भाऊबीज भेट रक्कम आणि प्रवास भत्ते बिल अदा झालेले नाही.
वरील बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने ४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण करणेबाबत नोटीस दिली होती.परंतु जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र राऊत यांनी उपोषण न करण्याची विनंती संघटनेला केल्यामुळे स्थगित केले होते.
असे असताना सुमारे तीन महीन्यात महिला बालविकास विभाग आणि पाचोरा प्रकल्प कार्यालयांनी आजतागायत कोणतीही न केल्यामुळे पुन्हा संघटनेवर उपोषण करण्याची वेळ आली आहे.
म्हणून याला जबाबदार असणाऱ्या दिनेश पाटील आणि जिजा राठोड यांच्या निलंबनाची कारवाई करावी आणि मयत मंगल पाटील यांच्या वारसांना विमा रक्कम मिळावी तसेच प्रकल्पातील अन्य प्रश्न सोडविण्यात यावेत.
या मागणीसाठी मयत मंगल गणपत पाटील यांच्या वारसदार आईंसह संपूर्ण कुटुंब अंगणवाडी कर्मचारी आणि संघटनेचे प्रतिनिधी राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.६ जून २०२४ रोजी जिल्हा परिषद समोर उपोषणास बसणार आहेत.

