1 min read

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे अमळनेर विधानसभा क्षेत्रातील 138 गावात जाऊन लोकांशी साधणार संवाद…

Loading

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे अमळनेर विधानसभा क्षेत्रातील 138 गावात जाऊन लोकांशी साधणार संवाद…

अमळनेर प्रतिनिधी
पक्ष संघटन व लोकांशी संवाद साधून वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान देणे हे काँग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी संदीप घोरपडे हे गेल्या कित्येक वर्षापासून करीत आहेत.. कोणत्याही विषयावर मुळापर्यंत जाऊन अभ्यासपूर्ण भाषण देत असतात.. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. विधानसभा क्षेत्रातील 138 गावांमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाचे प्रचार प्रसार ध्येयधोरणे लोकांपर्यंत ते मांडणार आहेत सध्या देशात लोकसभा निवडणुकीत
काँग्रेस पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या आहेत.. लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे यश आहे असे घोरपडे यांनी सांगितले..
सविस्तर माहिती अशी की संपर्क कार्यालय उद्घाटन व काँग्रेस पक्षाच्या 138 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्हा काँग्रेसने जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांना अमळनेर विधानसभा क्षेत्रातील 138 गावात जाऊन तेथील लोकांशी संवाद साधणे तसेच त्यांच्या समस्या जाणून घेणे व काँग्रेस प्रेमी तसेच काँग्रेस कार्यकर्ते व नेते यांची नवे जुने अशी सांगड घालून हा दौरा पूर्ण करण्याचा आदेश जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी जळगाव जिल्हा काँग्रेस भावनात हे पत्र देऊन संवाद यात्रेला शुभेच्छा दिल्या..।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *