1 min read

नोव्हेंबर २०१९ पासूनची रजा रोखीकरणाची बिले मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबाबत चौकशी करा

Loading

नोव्हेंबर २०१९ पासूनची रजा रोखीकरणाची बिले मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबाबत चौकशी करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ ( फेडरेशन )चे अध्यक्ष व सेक्रेटरी यांची पत्राद्वारे मागणी..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची रजा रोखीकरणाची देयके नोव्हेंबर २०१९ पासून प्रलंबित आहेत. याबाबतीत सदर बिले पेॅन्शान फंडातून अदा करावी म्हणून शिक्षण संचालनालयाने आदेश दिले होते. परंतु याबाबतीत कोषागार अधिकारी यांनी सदर बिले पेन्शन फंडातून अदा करावी किंवा कसे याबाबतीत त्यांच्या संचालक लेखा व कोषागारे मुंबई यांचे कडे मार्गदर्शन मागितले. हे मार्गदर्शन जानेवारी २०२४ मध्ये संबंधितांना मिळालेले आहे. असे असूनही जिल्ह्यातील मुख्याध्यापक कर्मचारी यांना रजा रोखीकरणाची बिले आजही मिळालेली नाहीत.
वेतन पथक अधिक्षक कार्यालयाकडून विले तयार करण्यासाठी विलंब लागणे, वेतन पथकाने विले तयार केल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी स्वाक्षरी करण्यासाठी विलंब लावणे, कोषागारात बिले सादर केल्यानंतर कोषागार कार्यालयाने अनावश्यक तृटी लावणे यामुळे शासनाने निधी उपलब्ध करुन दिलेला असूनही मुख्याध्यापक / शिक्षकेतर कर्मचारी यांना रजा रोखीकरणाची बिले अदा झालेली नाहीत. याबाबत चौकशी होऊन संबंधितांना समज देण्यात यावी ही विनंती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ ( फेडरेशन )चे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी शालीग्राम भिरूड यांनी पत्राद्वारे केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *