1 min read

कोणत्याही खाजगी शिकवणीशिवाय 95.20% गुण मिळवून तन्मय शेंडकर अमरकोर विद्यालयात प्रथम – खाजगी शिक्षक संघटनेकडून गौरव

Loading

कोणत्याही खाजगी शिकवणीशिवाय 95.20% गुण मिळवून तन्मय शेंडकर अमरकोर विद्यालयात प्रथम – खाजगी शिक्षक संघटनेकडून गौरव

मुंबई | प्रतिनिधी : भांडुप येथील अमोरकोर विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल सलग तेराव्या वर्षी सुद्धा 100 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे मुंबई सचिव दत्तात्रय शेंडकर यांचे चिरंजीव कु तन्मय याने 95.20% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे तन्मयने कोणतीही खाजगी शिकवणी लावली नव्हती. शालेय अध्यापनाचे दैनिक कार्य पूर्ण झाल्यानंतर शाळेचे संस्थापक श्री मारुती म्हात्रे यांच्या वैयक्तिक देखरेखीखाली चालणारे डिसेंबर महिन्यातील शिबिर की ज्यामध्ये अभ्यासक्रमाचे नियोजन करून बोर्डाच्या धर्तीवर प्रत्येक विषयावर दहा प्रश्नपत्रिका नियोजितपणे सोडवून घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. म्हणूनच गेलीस सलग तेरा वर्ष शाळेचा निकाल 100 टक्के लागतो अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री साईनाथ हांडे सर यांनी दिली. सदैव प्रेरणा देणारे व मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक अभिजीत थोटम सर विज्ञान शिक्षिका मीनाक्षी सुपालकर मॅडम राजेश कल्याणकर सर यांसह सर्व शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे व प्रसिद्धी प्रमुख तथा सहसचिव अनिल चिकणे यांनी तन्मय चे पालक तथा मुंबई सचिव दत्तात्रय शेंडकर यांच्या निवासस्थानी जाऊन तन्मयला पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *