1 min read

अमळनेरला जितेंद्र आव्हाड च्या प्रतिमेला भाजपाचे जोडे मारो आंदोलन.।

Loading

डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी के सन्मान मे भाजपा मैदान मे…

अमळनेरला जितेंद्र आव्हाड च्या प्रतिमेला
भाजपाचे जोडे मारो आंदोलन.।

अमळनेर प्रतिनिधी
पुरोगामीकत्वाचा नकली घोंगड पांघरून आदरणीय डॉ बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार जितेंद्र आव्हाड याने डॉ बाबासाहेबांचे चित्र फडण्याचे जे नीच कृत्य केले या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अमळनेर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जितेंद्र आव्हाड याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.बाबासाहेब के सन्मान मे भाजपा मैदान मे, जितेंद्र आव्हाड याचा धिक्कार असो, अशा अनेक घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यावेळी शहर अध्यक्ष विजय राजपूत,माजी शहर अध्यक्ष हरचंद लांडगे,उमेश वाल्हे,मोतीराम हिंदुजा, महेश पाटील,सुभाष पाटील,दिलीप ठाकूर,अनिल वाणी, दिपक भोई, गणेश बडगुजर,दिलीप साळी, महावीर मोरे,महेश संदाशिव,गोकुळ पाटील,समाधान पाटील,देवा लांडगे,योगीराज चव्हाण,राहुल चौधरी,गौरव सोनार,शिवदास महाजन,देवा भोई,बबलु बोरसे,राजेश खराडे, राहुल ठाकुर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वभारतीय जनता पक्षाचे अमळनेरचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *