1 min read

ईगल फाउंडेशन च्या वतीने मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांना राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४ जाहीर !

Loading

ईगल फाउंडेशन च्या वतीने मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांना राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४ जाहीर !
सांगली दि.२६(स्व.रा.तो)
मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांचा सामाजिक, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा, व नागरी संरक्षण संघटन, महाराष्ट्रातील मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून समाजसेवा क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्याच बरोबर त्यांच्याकडून नियमित होणाऱ्या अनेक सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक उपक्रमांची माहिती
तसेच त्यांना अनेक पुरस्कार, मानद डॉक्टरेट उपाधी मिळाली बद्दल ईगल न्यूजच्या संपादिका सौ.शालन विलासराव कोळेकर, ईगल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर व त्यांच्या संपूर्ण टीमने घेतल्यामुळे त्यांना
ईगल फाउंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात “राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४” जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार सोहळा रविवार दिनांक ९/६/२०२४ रोजी मा.डॉ. अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा तालुका- वाळवा, जिल्हा- सांगली येथे सकाळी ११.०० वाजता विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार असून त्यावेळी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कारामुळे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांना मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉ सोन्याभाऊ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुबई, चंद्रानंद कृषी पणन व समाज कल्याण संस्था गुंदवली ,उद्योजक समाजसेवक डॉ.किशोर अढळकर, स्वराज्य तोरण चारिटेबल ट्रस्ट भिवंडी व स्वराज्य तोरण मित्र परिवाराकडून अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यात येत आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *