1 min read

मुंदडा ग्लोबल चे पुन्हा वर्चस्व कु. वैभवी शशिकांत गोसावी 97.80% मिळवुन तालुक्यात प्रथम

Loading

मुंदडा ग्लोबल चे पुन्हा वर्चस्व कु. वैभवी शशिकांत गोसावी 97.80% मिळवुन तालुक्यात प्रथम

मुंदडा फाउंडेशन संचलित श्री एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील निकालाची परंपरा कायम ठेवून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात कु. वैभवी शशिकांत गोसावी ही विद्यार्थिनी 97.80% मिळवून तालुक्यात प्रथम आली.

तसेच युतीका संजीव पाटील 97% मिळवून द्वितीय तर कु. अनोखी प्रवल गुरव 96.40% मिळवून तृतीय, शृंगस्था पवार 95.20% मिळवून चौथी, तर निर्मल कुमार पाटील व यज्ञेश पाटील हे 95 टक्के गुण मिळवून पाचवे आले आहेत.

या परीक्षेत 51 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. सायन्स या विषयात कु. युतीका पाटील या विद्यार्थिनीस 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश मुंदडा, चेअरपर्सन सौ. छायाभाभी मुंदडा, सचिव श्री अमेय मुंदडा, सहसचिव श्री योगेश मुंदडा, श्री नरेंद्र मुंदडा, श्री राकेश मुंदडा, श्री पंकज मुंदडा, ऍडमिनिस्टर सौ. दीपिका मुंदडा, सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य श्री लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्य सौ. विद्या मॅडम, प्री प्रायमरी कॉर्डिनेटर सौ. योजना टक्कर, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *