माध्यमिक विभागातील अपूर्ण कर्मचारी संख्या बाबतीत शिक्षक आमदार दराडे यांचे सीईओंना पत्र.
![]()

माध्यमिक विभागातील अपूर्ण कर्मचारी संख्या बाबतीत शिक्षक आमदार दराडे यांचे सीईओंना पत्र.
जळगाव जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागात गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण कर्मचारी संख्या असल्याकारणाने तसेच जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांवरच हा विभाग आपला कार्यभार पाहत असल्याने राज्य सरकारी कर्मचारी विभागात नसल्याने विभागातील अनेक कामांच्या संदर्भात अडचणी येत असल्या कारणास्तव नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित साहेब यांना आपल्या स्तरावरून कार्यवाही संदर्भातले पत्र देऊन कर्मचारी उपलब्ध करून देण्यासंदर्भात विनंती केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना समन्वय समितीचे डॉ. मिलिंद बागुल, समन्वयक तुळशीराम सोनवणे, आमदार किशोर दराडे यांचे स्वीय सहाय्यक उत्तम जाधव,हरजीत पवार, संतोष कचरे, प्रेम झंवर यांनी पत्र देऊन मा. अंकित साहेब यांच्याशी चर्चा करत माध्यमिक विभागात येणाऱ्या अडचणी आणि शिक्षकांचे असणारे प्रश्न या संदर्भात अवगत केले मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यासंदर्भात आश्वासन दिले.

