1 min read

SDRF जवान वैभव सुनिल वाघ पांढरद ता भडगाव या त्यांच्या गावी कुटूबियांची ना.अनिल पाटील यांनी भेट घेऊन केले सात्वन

Loading

SDRF जवान वैभव सुनिल वाघ
वाक ता भडगाव या त्यांच्या गावी कुटूबियांची ना.अनिल पाटील यांनी भेट घेऊन केले सात्वन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी गेलेली धुळ्यातील एसडीआरएफ पथकाची एक बोट बुडाली. या दुर्घटनेत दोन जवानांसह एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान मृत जवानांमध्ये जळगाव जिल्ह्यातील एका जवानांचा समावेश आहे.
वैभव सुनील वाघ असं या मृत जवानाचे नाव असून ते भडगाव तालुक्यातील पांढरद येथील रहिवासी आहे. वैभव वाघ हे राज्य आपत्ती दलातील पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते.
वरील बातमी कळताच अमळनेर येथील मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी तात्काळ कुटुंबाची भेट घेत विचारपूस करत परीवाराचे सांत्वन केले व शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *