1 min read

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी धरणगावचे पै. भानुदास विसावे यांची निवड..

Loading

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी धरणगावचे पै. भानुदास विसावे यांची निवड..

◾पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात महावितरण आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी खुल्या गटातून धरणगावचे पै. भानुदास विसावे करणार महाराष्ट्राचे नेतृत्व..

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगाव : येथील नामांकित पैलवान भानुदास विसावे यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
महावितरण तर्फे पुणे येथे गुलशे तालीम संघ आखाडा याठिकाणी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत पै. भानुदास विसावे हे राष्ट्रीय कुस्तीसाठी पात्र ठरले आहेत. यासह पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात दि. २९ ते ३१ दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी खुल्या गटातून पै. विसावे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत. याआधी भानुदास विसावे यांनी कुस्ती क्षेत्रात सुवर्ण पदक प्राप्त करून गावाचे व महावितरणचे नाव मोठे केले आहे. पुणे येथील गुलशे तालीम संघात धुळ्याचे पै.संजय गिरी महावितरणचे काटकर, वायदंडे, सुरेश देवकर व आखाड्याचे वस्ताद भूषण जाधव यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पंच गोडे सर निवड समितीच्या सदस्यांनी निवड केली. या निवडीबद्दल पै. विसावे यांचे धरणगाव व परिसरातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *