एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद…
![]()

एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद…
अमळनेर प्रतिनिधी
१ जानेवारी २०२४ पासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अदयावत करुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला असून १ जानेवारी ते २० मे पर्यंत १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ लाख ७४५ हजार तिकीटांची विक्री झाली होती म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ३ लाखाने जास्त आहे. सथ्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीव्दारे दररोज १० हजार तिकीटे काढली जात आहेत.
प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने एसटीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच मोबाईल भ्रमणध्वनी अँपच्या माध्यमातून देखिल प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पध्दतीव्दारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये १ जानेवारी, २०२४ पासून अमुलाग्र बदल करुन त्या अदयावत करण्यात आल्या. परिणामी त्यातील अनेक दोषांचे निर्मुलन झाल्याने सदर ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीव्दारे प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे देखिल आगाऊ आरक्षण मिळु शकते. त्यासाठी महामंडळाने तएपॉजींत या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच अँपच्या वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन केले आहे.
तथापी, ऑनलाईन आरक्षण करतांना प्रवाशांना तांजिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. सदर नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास सुरु असणार आहे. तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन देखिल तिकीटे न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२० ४४५६४५६ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. (अभिजीत भोसले )
जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

