1 min read

विजयनाना पाटील आर्मी स्कूलचा बारावीचा निकाल ९८.३६%

Loading

विजयनाना पाटील आर्मी स्कूलचा बारावीचा निकाल ९८.३६%

अमळनेर प्रतिनिधी-(शरद पाटील सर)
अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता बारावीचा निकाल 98.36% एवढा लागला असून 61 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एक विद्यार्थी गैरहजर होता. मयूर हटकर या विद्यार्थ्याने 87.17 % टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर तुषार राठोड याने 86.83 % गुण मिळवत दुसरा तर साई नंदू मोरे यांनी 86.50 % गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत विजय पाटील,मार्गदर्शिका शीलाताई पाटील,प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील,प्रशासकीय अधिकारी प्रा.शाम पवार, शिक्षण मानद संचालक प्रा. सुनील गरुड, प्राचार्य एस. यु. पाटील, सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *