1 min read

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान

Loading

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर शिवसैनिकांबरोबर आपला मतदानाचा हक्क बजावल्या नंतर आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देताना.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान

मुंबई, दि. २० (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ३८.७७ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

भिवंडी- 37.06 टक्के
धुळे- 39.97 टक्के
दिंडोरी- 45.95 टक्के
कल्याण – 32.43 टक्के
मुंबई उत्तर – 39.33 टक्के
मुंबई उत्तर मध्य – 37.66 टक्के
मुंबई उत्तर पूर्व – 39.15 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – 39.91 टक्के
मुंबई दक्षिण – 36.64 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के
नाशिक – 39.41 टक्के
पालघर- 42.48 टक्के
ठाणे – 36.07 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *