1 min read

कल्याण डोंबिवली आर एस पी अधिकारी युनिट लोकसभा निवडणूकित पोलिसांसोबत कर्तव्यावर

Loading

कल्याण डोंबिवली आर एस पी अधिकारी युनिट लोकसभा निवडणूकित पोलिसांसोबत कर्तव्यावर

ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कार्य कौतकस्पद: पोलीस उपआयुक्त डॉ.विनयकुमार राठोड.
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत कल्याण डोंबिवली आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट लोकसभा निवडणूकित पोलिसांसोबत बंदोबस्त कर्तव्य करीत आहे.ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कार्य कौतकस्पद आहे.अश्या शब्दात पोलीस उपआयुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.लोकसभा निवडणूकीचा पाश्र्वभूमीवर संपूर्ण देशात सभा,रॅली, असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने, याचा परिणाम रस्ते वाहतूक विभागवार जास्त होतो.बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते अश्या परिस्थितीत मनुष्यबळ कमी असल्यामुळे पोलीस अधिकारी व वाहतूक पोलीस यांची खूप तारांबळ उडते.परंतु कल्याण ठाणे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे पालघर ठाणे,आणि नाशिक विभागीय युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी, ठाणे ,नवी मुंबई,नाशिक चे विभागीय समादेशक दिलीप स्वामी यांचा नेतृत्वाखाली डोंबिवली कल्याण चे विभागीय समादेशक महादेव क्षीरसागर, कल्याण डोंबिवलीचे समादेशक अनंत किनगे यांचा सहकार्याने संपूर्ण आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट लोकसभा निवडणूकित पोलीस उप आयुक्तालय वाहतूक विभाग ठाणे शहर अंतर्गत,वाहतूक पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार, भिवंडी बायपास,वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यादव साहेब, व भिंगारदिवे साहेब यांचा मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागासोबत बंदोबस्त करण्यासाठी तैनात झाली आहे.यासाठी भिवंडी बायपास वाहतूक शाखेचे वाहतूक पोलिस लोने मेजर, भादवड मेजर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे. दरम्यान भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींचा दौऱ्यासाठी लाखोंचा संख्येने कल्याण पश्चिम येथे जनतेचा प्रवाह ,आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्हाला आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे खूप महत्त्व पूर्ण योगदान,आणि सहकार्य लाभत आहे.खरोखर आर एस पी अधिकारी शिक्षक प्रामाणिकपणे दिलेले कर्तव्य करीत आहेत.आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट नियोजन खूप स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे असे वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक यादव साहेब यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात कर्तव्य करण्यासाठी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी,विभागीय समादेशक दिलीप स्वामी,यांचा नेतृत्वाखाली,जिल्हा समादेशक अनंत किनगे, जितेंद्र सोनवणे, प्रकाश चव्हाण, ठाकूर सर, ओमप्रकाश धनविजय, बाळकृष्ण जगे, भोईर सर, बाळासाहेब गुंजाळ , किरण वसईकर,संतोष कदम, संतोष हंडाळ,दत्तात्रय पटवर्धन, योगेश अहिरे, डॉ.अशोक गुप्ता,डॉ. दिनेश गुप्ता , उगले सर, संजय खैरनार,बबन पाटील, संतोष गोरडे, अमोल खरमाळे,सुभाष गायकवाड, शरद बोरसे, संपूर्ण आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट लोकसभा निवडणूक राष्ट्रीय कार्यक्रम कर्तव्यावर उपस्थित आहेत. कल्याण डोंबिवली,अंबरनाथ विभागीय समादेशक श्री.महादेव क्षीरसागर यांचेही मोलाचे मार्गदर्शन करीत विशेष परिश्रम घेत आहेत.महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष श्री.संजय शेंडे, उपाध्यक्ष पी.एस. महाजन , कोकण विभाग उपाध्यक्ष हिराजी पाटील , महासमादेशक अनिल शेजाळे यांनी संपूर्ण टीम चे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *