1 min read

शंभरीत परिषदेचे नेतृत्व तरुणांच्या हाती जाणार,परिषद 25 युवा संघटकांची नियुक्ती करणार,मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन

Loading

शंभरीत परिषदेचे नेतृत्व तरुणांच्या हाती जाणार,परिषद 25 युवा संघटकांची नियुक्ती करणार,मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन

मुंबई : मराठी पत्रकार परिषद आणखी 14 वर्षांनी आपले शतकमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत.. परिषदेच्या शंभराव्या वर्षात परिषदेचं नेतृत्व तरूण, सक्षम नेतृत्वाच्या हाती जावे म्हणून परिषद 25 तरूण पत्रकारांची, युवा संघटकांची टीम तयार करीत आहे.. यामध्ये 35 वर्षांच्या आतील तरूण पत्रकारांचा समावेश असेल.. प्रत्येक विभागातून मिळून एकूण 25 पत्रकारांची निवड केली जाईल.. त्यासाठी विभागीय सचिव आणि राज्य उपाध्यक्षांनी आपल्या विभागातून 3 – 3 नावं पाठवायची आहेत.. त्यातून 25 जणांची निवड केली जाईल.. त्यांना युवा संघटक म्हणून संबोधले जाईल आणि परिषदेशी संबंधीत महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या जातील.. त्यातील एकाची “प्रमुख युवा संघटक” म्हणून नियुक्ती केली जाईल.. भविष्यात याच तरूण युवा संघटकांमधून परिषदेचे पदाधिकारी तयार होतील.. परिषदेचा इतिहास, परंपरा, उद्देश याची माहिती त्यांना करून दिली जाईल.. भविष्यात परिषदेची सूत्रं तरूण पत्रकारांच्या हाती गेली पाहिजेत अशी विद्यमान पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.. त्यासाठी हा प्रयत्न आहे.. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केलं आहे…ज्यांना युवा संघटक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी सवत:देखील आपली नावं शरद पाबळे ( मो.98220 83111) अध्यक्ष यांच्याकडे पाठवावीत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *