1 min read

एस.टी. महामंडळना अपघातग्रस्त कर्मचारी,बिचाराना खिसा खाली, कोण शे त्याना वाली?

Loading

एस.टी. महामंडळना अपघातग्रस्त कर्मचारी,बिचाराना खिसा खाली, कोण शे त्याना वाली?

काल नंदराजाच्या नगरीतून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धुलीकापट्टनमला येत होतो. दोन तासाचा प्रवास; पण बसला चार तास लागले कारणही तसेच होते. बिचाऱ्या चालक वाहकांचा काहीच दोष नाही त्या गाडीतील प्रवासी टोकाचे सहनशिल आणि वाहकाविषयी सर्वांच्या तोंडी सहानूभूती होती वाहकाचा (कंडक्टर) कोरोना काळात अपघात झाला होता. अपघातातून वाचला, बरा झाला मात्र बगलेत काठी कायमची साथीदार बनली. गाडी निघाली गावाच्या बाहेर स्थानपरत्वे, गाव परत्वे खचाखच भरलेली गाडी थांबवून तिकीटाची बुकींग सुरु होती. वाहकाची शारिरीक अवस्था पाहता चालु वाहनात बुकींग अशक्य होती. वेळ होत होता तरीही प्रवाशांची वाहकापरी सहानुभूती दिसून येत होती.

मी वाहका शेजारीच बसलो होतो. त्यांना बोलतं केलं. मी विचारले, आपण ऑफीसला बदली का करीत नाही? त्यावर ते म्हणाले सरळ मार्गाने प्रयत्न केले, यश आले नाही. व बदलीसाठी जे करावे लागते ते माझ्या तत्त्वात बसत नाही. मुलांचे शिक्षण सुरु आहे. घरी बसलो तर शिक्षणापासून वंचित राहतील. मी वाहकाचे नाव गाव माहित करून घेतले परंतु तो वाहक बंधु चौकशीच्या फेऱ्यात अडकू नये म्हणून त्यांचा व गावाचा नामोल्लेख टाळतो. जाहिरातींमधून महामंडळ (प्रगतीचे) प्रकाशाचे मोठमोठे दिवे पाजळते पण हा दिव्याखाली अंधार नाही काय? प्रवाशांचे ‘हाल’ हवाल काय वर्णावी? पण कमीत कमी ज्यांच्या जीवावर बस चालते त्या कर्मचाऱ्यांना तर न्याय द्या. तुमचे नाव सोनुबाई आहे पण त्या कथलाच्या वाळाचे काय? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *