1 min read

अमळनेरला महिला मंच तर्फ डॉ.अपर्णाताई व प्रा. शीला पाटील यांनी अयोध्या नगर या भागात जाऊन पाणीबचत व पाण्याची काटकसर कशी करावी याबाबत केले उद्बोधन

Loading

अमळनेरला महिला मंच तर्फ
डॉ.अपर्णाताई व प्रा. शीला पाटील यांनी अयोध्या नगर या भागात जाऊन पाणीबचत व पाण्याची काटकसर कशी करावी याबाबत केले उद्बोधन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर महिला मंच तर्फे आज दिनांक 25 -4 -24 रोजी डॉ.अपर्णाताई व प्रा. शीला पाटील यांनी अयोध्या नगर या भागात जाऊन पाणीबचत व पाण्याची काटकसर कशी करावी व पावसाचे वाहून जाणारे पाणी कसे सुरक्षित ठेवावे यासंबंधी माहिती सांगितली.
अयोध्या नगर येथे सौ पिंगळे मॅडम यांच्या घरी त्या भागातील सर्व महिला मंडळाच्या मैत्रिणी जमा झाल्या होत्या तेथेच सुरुवातीला प्रा.शीला पाटील यांनी प्रास्ताविक केले व मंडळ कोणकोणती कामे महिलांसाठी आतापर्यंत करीत आली याचा आढावा घेतला व मे महिन्यात पाण्याची टंचाई सर्वदूर जाणवत असल्याने आता महिला मंचने ते काम हाती घेतले आहे त्यासाठी त्यांनी चिखलदरा येथील डॉक्टर जोग यांचा पाणीबचतीचा एक अनुभव सांगितला नंतर डॉ. अपर्णाताईंनी पाण्याचे महत्व व पाणी बचत कसे करावे,? तसेच ज्यांच्या घरी बोअरवेल असेल त्यांनी गच्चीवरचे पाणी तेथे कसे सोडावे? याचे चित्राद्वारे स्पष्टीकरण केले .वाॅटर हार्वेस्टिंग चे महत्व विशद करून वाहून जाणारे पाणी आपण अडविले पाहिजे हे सांगितले ह्या चर्चेत तेथील सौ पिंगळे मॅडम, बिर्ला मॅडम, तसेच साळवी मॅडम ,कोठारी सुनीता यांनी सहभाग घेतला व आपलीही मते मांडली . अशाप्रकारे त्या भागात ही मिटिंग पार पडली व तेथील महीलांना पाण्याच्या बचतीचे महत्त्व कळले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *