1 min read

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रमसंगमनेर येथे ऊसतोड कामगार भगिनींना साडी वाटप

Loading

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
संगमनेर येथे ऊसतोड कामगार भगिनींना साडी वाटप
ठाणे( प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे, उद्योजक समाजसेवक डॉ रामचंद्र देसले पोलीस पाटील संघाचे मा.अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, स्वामीनारायण मंदिर हॉल चे संचालक डॉ दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक उद्योजक डॉ किशोर अढळकर, लेडीज एक्स्प्रेस ग्रुप चा श्रीमती मधुबेन ठक्कर,यांचा सहकार्याने,संगमनेर येथील आदर्श कॉलनी जवळ , मालदाड रोड, संगमनेर,येथे ऊसतोड कामगार भगिनींना आर एस पी अधिकारी युनिट कमांडर नाशिक,ठाणे पालघर विभाग ,श्री. दिलीप स्वामी, डॉ. मनिलाल शिंपी यांचा हस्ते साडी वाटप करण्यात आले.यावेळी आंब्रे पाटील कन्या विद्यालयाचे सहायक शिक्षक, आर एस पी अधिकारी श्री.कैलास कानवडे याचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *