1 min read

महाराष्ट्रातील 50 शालेय विद्यार्थ्यांना नि:शुल्क इस्रोला जाण्याची संधी.

Loading

▪️महाराष्ट्रातील 50 शालेय विद्यार्थ्यांना नि:शुल्क इस्रोला जाण्याची संधी.

▪️नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे गुणवंत 50 विद्यार्थी जाणार इस्रोला.

15 मे पर्यंत करू शकतात अर्ज 9 जुनला होणार परीक्षा.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- विद्यार्थी व पालकांसाठी सुखद बातमी आहे. राज्यातील 50 हुन अधिक विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला जाण्याची संधी जळगावच्या नोबेल फाउंडेशन ने उपलब्ध करून दिली आहे.2024 साठी संपन्न होणाऱ्या या उपक्रमाचा प्रारंभ झाला असून सदर परीक्षा 9 जून 2024 रोजी ऑनलाइन पद्धतीने संपन्न होणार आहे . विज्ञान व संशोधन क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी नोबेल फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था(इस्रो), आयआयटी, आयआयएम यासारख्या उच्च शिक्षण संस्था अनुभवता याव्यात तसेच विज्ञान व गणित या विषयाचा पाया पक्का व्हावा यासाठी नोबेल फाउंडेशन तर्फे “नोबेल सायन्स टॅलेंट सर्च” परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते . इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सर्व बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा 9 जून 2024 रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.अर्ज करण्यासाठी www.nobelfoundation.co.in या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे . मागील वर्षी या परीक्षेद्वारे 61 विद्यार्थ्यांची इस्रो,आयआयटी सहलीसाठी निवड झालेली आहे.आजपर्यंत या योजनेच्या माध्यमातून 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी इस्रो ,आयआयटी भेटीचा लाभ घेतला आहे . या परीक्षेत गुणवत्ता यादी मध्ये येणाऱ्या प्रथम पन्नास विद्यार्थ्यांना निशुल्क इस्रो, आयआयटी आयआयएम, सायन्स सिटी येथे अभ्यास सहलीला नेण्यात येणार आहे . गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी निवडण्यात येईल .या विद्यार्थ्यांना करिअरच्या संदर्भात उन्हाळी व हिवाळी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच अवकाश विषयक पुस्तके भेट दिली जाणार आहेत. सदर परीक्षेसाठी पाचवी ते सातवी ,आठवी ते दहावी आणि अकरावी, बारावी डिप्लोमा असे तीन गट करण्यात आले आहेत, तिन्ही गटांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असून परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे . या उपक्रमासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन , ओमकार करिअर अकादमी ,निर्मल सीड्स , स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांचे सहकार्य लाभत आहे. या उपक्रमाबाबत बोलताना नोबेल फाऊंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील म्हणाले की ” महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहेत या विद्यार्थ्यांना शालेय वयापासून जर संशोधनाची गोडी लागली तर महाराष्ट्रातून नोबेल विजेते शास्त्रज्ञ घडतील यासाठी सामूहिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणून नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करीत आहोत जेणेकरून गोरगरिबांच्या मजुरांच्या मुलांनासुद्धा इस्रो सारख्या जागतिक दर्जाच्या संस्था अभ्यासायला मिळतील” तरी अधिकाधिक शाळा , क्लासेस व विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक नोबेल फाउंडेशन चे संस्थापक जयदीप पाटील यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी नोबेल फाउंडेशन प्रगती शाळेसमोर जळगाव 7218501444, 9922004193 या क्रमांकावर संपर्क साधावा.

फोटो कॅप्शन – मागील वर्षी इस्रो भेटीसाठी पात्र राज्यातील विद्यार्थी व शिक्षकवृंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *