हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने संदीपजी घोरपडे यांचा सत्कार
![]()

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने संदीप घोरपडे यांचा सत्कार
अमळनेर प्रतिनिधी- साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी कृषी, बेरोजगारी, सामाजिक, शैक्षणिक व विविध विषयांवर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये जाऊन विविध विषयांवर त्यांनी आज तागायत प्रबोधनाचं काम ते करीत आहेत.. शेतकरी कष्टकरी उपेक्षित लोकांची ते संपर्क साधत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.. कोणत्याही प्रकारची मदत असो,किंवा काही काम असेल तर त्या कामाचं तात्काळ ते निरसन करतात त्यांची काम करण्याची हातोडी अभिनंदनिय आहे…
घोरपडे यांनी अनेक विषयांवर ते मार्गदर्शक म्हणूनही जात असतात.. त्यांच्या कार्याची नुकतीच दखल काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आली..
हिंदी अध्यापक मंडळाचे मार्गदर्शक संदीपजी घोरपडे सर यांची जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस डी देशमुख,
हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे, सचिव दिलीप पाटील ,माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार, जिल्हा कार्यकारणी सदस्य एन आर चौधरी, मनीष उघडे सदस्य कमलाकर संदानशिव, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन उपस्थित होते..
सत्कार झाल्यानंतर सत्कारमुर्ती संदीपजी घोरपडे यांनी विविध विषयांचे मार्गदर्शन करत शिक्षकांशी हितगुज केले… हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्याबद्दल व राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल
एस डी देशमुख सर यांनी गौरव उद्गार काढले…

