निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज-उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर
![]()

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज-उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर
लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर पत्रकार परिषद संपन्न..
अमळनेर प्रतिनिधी- ” जळगांव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसासाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघाची प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली असून निवडणूक सुरळीतपणे पार पडेल यासाठी प्रयत्नशील आहोत ” अशी माहिती अमळनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी महादेव खेडेकर यांनी दिली. अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महादेव खेडेकर पुढे म्हणाले की ” अमळनेर विधानसभा मतदारसंघात एकूण ३०१९३१ मतदारसंख्या आहे.३२० मतदार केंद्र आहेत.
नियंत्रण कक्ष स्थापन केलेली आहेत.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे आचार संहिता प्रमुख आहेत. एक खिडकी योजनेत कामकाज सुरळीतपणे होईल अशी सुविधा आहे.
या निवडणुकीसाठी ४११ केंद्राअध्यक्ष,४२० मतदान केंद्र अधिकारी १, इतर मतदान अधिकारी ९५८ असे एकूण १७८९ कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
सैद्धांतिक व व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रताप महाविद्यालयात स्ट्रॉंग रूम बनवण्यात आले आहेत तेथून साहित्य वाटप व स्विकृती होणार आहे.बाजाराच्या दिवशी बी एल ओ मार्फत मतदार सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.पोलीस, निवडणूक कर्मचारी यांना टपाली मतदान व इ डी सी ची सुविधा देण्यात येणार आहे.आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येणार आहे.अशी माहिती खेडेकर यांनी दिली.
यावेळी। उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवालकर, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, न पा चे मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे,नायब तहसीलदार प्रशांत धमके हे उपस्थित होते.

