सावखेडा केन्द्र शाळेत शाळापूर्व तयारीमेळावा! केंन्द्रस्तरीय प्रशिक्षण ! संपन्न
![]()



सावखेडा केन्द्र शाळेत शाळापूर्व तयारी
मेळावा! केंन्द्रस्तरीय प्रशिक्षण ! संपन्न
मुंगसे ता अमळनेर
दि .१७ (वार्ताहर )जिल्हा परिषद केंद्र शाळा सावखेडा येथे नुकताच २०२४ – २०२५चा शैक्षणिक वर्षात ईयत्ता १ ली त दाखल होणाऱ्या मुलासाठी शाळा पूर्वतयारी मेळावा व केन्द्रस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लांबोळे सर रुंधाटी हे होते मेळाव्याचे प्रास्ताविक बिर्हाडे सर मठगव्हाण यांनी केले त्यानंतर प्रत्येक शाळेत मेळावा गावा -गावात दवंडी देऊन कशापद्धतीने घ्यावा या विषयी माहिती व मार्गदर्शन जिजाबराव पाटील गंगापुरी यांनी केले केंद्रप्रमुख चंद्रकात साळुखे यांनी मेळावा नियोजन मुलासाठी व पालकांसाठी या विषयी माहिती देऊन मेळाव्यात प्रत्येक प्रात्यक्षिक एकुण ७ स्टॉलवर कृती युक्त पद्धतीने घेण्यात आले
केन्द्रस्तरीय मेळाव्यासाठी सावखेडा केन्द्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकवर्ग व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच लोकमतचे पत्रकार भानुदास पाटील उपस्थित होते
केन्द्रस्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहांत आनंदमय वातावरणात प्रत्यक्ष कृती युक्त पद्धतीने साजरा झाला शेवटी प्रत्येक शाळेला दाखलपात्र मुलांच्या संख्येप्रमाणे पुस्तीकांचे वाटप करण्यांत आले

