1 min read

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगांवला संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक

Loading

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक

अमळनेर प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडची जळगाव येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकीची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली बैठकीत जिल्हाध्यक्ष तुषार सावंत यांनी संघटनात्मक कामकाजाचा आढावा मांडला व पुढील नियोजनाची माहिती दिली संभाजी ब्रिगेडच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत काय केलं पाहिजे यावर मत व्यक्त केले देशाची वाटचाल अनपेक्षितरित्या हुकूमशाहीकडे सुरू ईडी , सीबीआय आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करत मुस्कटदाबी केली जातेय. देशाचा मूलाधार असलेलं संविधान आज धोक्यात आहे म्हणूनच संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय जर आज हे रोखता आलं नाही तर भविष्यात सार्वत्रिक निवडणुका होतील की नाही असा प्रश्न आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जो पक्ष शेतकरी , कष्टकरी , वंचित उपेक्षित लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची तयारी दाखवेल त्याच्यासोबत आज आणि भविष्यात देखील आपण उभे राहिले पाहिजे असा निर्धार यावेळी करण्यात आला.
बैठकीत प्रदेश संघटक श्याम पाटील,
धरणगाव तालुकाध्यक्षपदी वाकटुकी येथील रविंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी शोभराम प्रतिष्ठानचे नरेंद्र पाटील , संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर चौधरी , महानगर अध्यक्ष संदीप पाटील , जळगाव तालुकाध्यक्ष प्रफुल पाटील , एरोडलं तालुकाध्यक्ष संभाजी पाटील , जिल्हासंघटक गणेश पाटील , संदीप मांडोळे , अविनाश पाटील , भरत पाटील , संदीप पाटील , प्रदीप पाटील , सुमेरसिंग पाटील , सुभाष पाटील , विलास पाटील , राहुल शिंदे , शंतनू जगताप , हर्षल वाणी , राकेश जगताप , राकेश कोठारी , अनिरुद्ध शिसोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *