आग नही कोई तेजाब सा लगता है!तोफो की तरह बरसा शेरो की तरह गर्जा है ,यही बात यारो बस भीम का सहारा है
![]()


आग नही कोई तेजाब सा लगता है
तोफो की तरह बरसा शेरो की तरह गर्जा
है यही बात यारो बस भीम का सहारा है
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला भीमरमाई प्रतिष्ठान, सत्यशोधकी साहित्य परिषद, एडवोकेट बबनभाऊ बाहेती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवी संमेलनाच्या आयोजनात कवींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. सुरुवातीस कवी संमेलनाध्यक्ष कविवर्य विलास मोरे, उद्घाटक मुकुंदभाऊ सपकाळे ,प्रमुख अतिथी डॉ. मिलिंद बागुल प्राचार्य डॉ. अनिल लोहार उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. वाय. हिवरे,डॉ.गौतम भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला कवी रमेश धुरंधर यांनी गायलेल्या
ये आग नही कोई तेजाब सा लगता है
भीम काही दीवाना होगा तेजाब सा लगता है
या कवितेने सुरुवात झाली.
भीम हमारा भाग्य विधाता है
भीम का दिवाना सारा हिंदुस्तान है
देश विदेश मे मेरे भीम की शान है
कोई ना होगा मेरे भीम जैसा
इस बात का हमे अभिमान है
कवी घनश्याम भुते वरणगाव यांनी भीम हमारा भाग्यविधाता ही कविता सादर केली तर संतोष साळवे यांनी बाबासाहेब या कवितेत
तुमच्या शिकवणुकीची जाणीव ठेवून
आम्ही शिखराच्या टोकावर चढलोय
मग संघटना बळकट करण्यासाठी
बाबासाहेब सांगा कुठे कमी पडलोय?
या कवितेतून वस्तुस्थिती मांडली.
अरुणकुमार जोशी यांनी बाबासाहेबांचे स्मरण आपल्या कवितेतून केले तर सुखदेव वाघ यांनी विसरलो नाही आम्ही या कवितेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले
मुकेश कुरील यांनी, म्हणून मला देवळात जाणे आवडते ही उपहास गर्भ कविता सादर केली तर मंगल बी. पाटील यांनी
इथे दगडांना झरे फुटू लागले आभाळातील ढगांचे मात्र किनारे सुकू लागले या कवितेतून दलित चळवळीची वास्तवता मांडली ज्योती वाघ बाविस्कर यांनी
केलास असा रूढी वरती प्रहार भीमा
झाला आहे वाईटांचा संहार भीमा
खाली माना हाती झाडू कसे राहिलो
तुझ्यामुळे तो सुटला आता जोहार भीमा
ही गझल सादर केली.
कवी प्रकाश पाटील यांनी राजकारणी तडका कवितेतून मांडला.
कवयित्री इंदिरा जाधव यांनी बाबासाहेब आंबेडकर या कवितेतून बाबासाहेबांच्या कार्याची महती मांडली
भारतीयांच्या हृदयावरती ज्यांचे कोरले नाव
अजरामर झाले हो आमचे भीमराव
हाल अपेष्टा सहन करून केली काळावर मात
अजरामर झाले हो आमचे भीमराव.
प्रा. डॉ.प्रदीप सुरवाडकर यांनी जय संविधान कवितेतून भारतीय लोकशाहीची महती गायली.
सुधीर प्रकाश महाजन यांनी साहेब ही कविता सादर केली कवी किशोर नेवे यांनी आपल्या कवितेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले शिवराम शिरसाट यांनी बोधिसत्व ही कविता सादर केली. कवी आर. जे. सुरवाडे यांनी वामनदादा कर्डक यांचे गीत सादर केले. डॉ. मिलिंद बागुल यांनी माणूस ही कविता सादर केली कवी संमेलनाचे अध्यक्ष विलास मोरे यांनी आकाशाचे नाव आहे भीमराव ही कविता सादर केली. उद्घाटक मुकुंद सपकाळे यांनी साहित्यिक विचारवंत आणि लोकशाही मूल्य जाणणाऱ्या नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार देशात, समाजात रूढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज, आवश्यकता असल्याचे मत याप्रसंगी मांडले. कार्यक्रमाप्रसंगी प्रा. डॉ. गौतम भालेराव, प्रकाश दाभाडे, अनिल सुरडकर, राजू पाटील, प्रकाश बाविस्कर, महेंद्र केदार, शिरीष चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार शिरीष चौधरी यांनी मानले. कार्यक्रमात मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत मतदान करणे विषयी शपथ घेण्यात आली.

