1 min read

सोशल मीडियाचा प्रभावामुळे गौमाता व तीचे पिलू सुरक्षित

Loading

सोशल मीडियाचा प्रभावामुळे
गौमाता व तीचे पिलू सुरक्षित

अमळनेर प्रतिनिधी
आज दुपारी आमच्या कॉलनी एरियात मुकेश पाटील सर (साने गुरुजी हायस्कुल )यांच्या घराच्या मागे गौ माता प्रसूती झाली असता सायंकाळ पर्यंत गायीच्या तपासाला कुणी आले नाही. याबाबत गौमाता व तीचे पिलूचे फोटो सोशल मीडियावर मी (प्रा. हिरालाल पाटील सकाळ पत्रकार )व्हायरल केले असता गायीचे मालक गोहील नगर परिसरातील रहिवासी सुनील शेटे यांनी रात्री 8 वाजता सोशल मीडियावर फोटो पाहिले असता लागलीच त्यांनी संपर्क करीत गाय व पिलू आपल्या घरी नेले.
दुपारपासून प्रसूती झालेली गायीजवळ भूगोल मंडळाचे तालुकाध्यक्ष मुकेश पाटील सर,समाधान खैरनार सर, यांनी लक्ष ठेवीत पिलूचे कुत्र्यांपासून बचाव केला. तर मुकेश पाटील यांनी बाजारात जाऊन गायीला हिरवा चारा आणून खाऊ घातला.
गायीचे मालक सुनील शेटे यांना गाय व पिलू सुरक्षित परत देताना मुकेश पाटील, समाधान खैरनार, दयानंद महाजन, प्रा. हिरालाल पाटील उपस्थित होते. यावेळी मुकेश पाटील यांचे गायीचे मालक यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *