1 min read

श्रीमती कान्होपात्रा आचणे यांना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजने अंतर्गत ठेव पावती भेट…

Loading

श्रीमती कान्होपात्रा आचणे यांना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजने अंतर्गत ठेव पावती भेट…

जळगांव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव (ग.स.सोसा.जळगाव) तर्फे सभासद श्रीमती कान्होपात्रा बालाजी आचणे यांना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजने अंतर्गत संचालक विजय शांतीलाल पवार यांच्या हस्ते पंचवीस हजार रुपयांची ठेव पावती देण्यात आली. सदर योजनेअंतर्गत दोन मुलींवर कुटुंब नियोजन केल्याबद्दल प्रत्येकी बारा हजार पाचशे प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम ग स सोसायटी तर्फे देण्यात आली आहे. सदर रक्कम मुदत ठेव म्हणुन दोन्ही मुलींच्या नावे ठेवण्यात आली असून सज्ञान झाल्यावर मुलींना रुपये पन्नास हजार इतका लाभ मिळेल. याप्रसंगी संचालक विजय पवार,व्यवस्थापक वाल्मिक पाटील, लेखापाल शामकांत सोनवणे, कर्ज अधीक्षक ज्ञानेश्वर बाविस्कर व कर्मचारी यांची उपस्थिती होती.सोसायटी तर्फे विविध सभासद हिताच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. तत्पर सेवेबाबत सभासद यांनी समाधान व्यक्त केले आहे.सभासदांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असून सभासद सेवा हाच उद्देश असल्याचे संचालक विजय शांतीलाल पवार यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *