1 min read

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवडणुक कामकाजा संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन

Loading

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवडणुक कामकाजा संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन

माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिले निवेदन

जळगांव प्रतिनिधी-
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक 2024 मतदान दिवशीचे काम व यासंबंधी प्रशिक्षण यातून दिव्यांग, गंभीर आजार असलेले गरोदर महिला आणि प्रसुती रजेवरील महिला यांना सूट देण्यात यावी तसेच वय वर्षे 55 वयावरील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष पदाचे काम न देता मतदान अधिकारी क्रमांक एक, दोन, तीन ची कामे देण्यात येऊन त्यांच्या कामाचा भार हलका करण्यात यावा अशी मागणी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा वाढता पारा पाहता अशा परिस्थितीतून जात असलेल्या कर्मचारी वर्गाला तसेच वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना विविध व्याधींचा सामना करावा लागत असतो तसेच बहुतेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या सुरू असतात वाढत्या तापमानात कामाचा ताण होणारी धावपळ व दगदग तसेच तांत्रिक टेक्निकल बाबींशी संबंध पाहता त्यांना अडचणी येऊ शकतात त्यामुळे केंद्राध्यक्ष पदाऐवजी अशा 55 वर्षे वयावरील व्यक्तींना मतदान अधिकारी क्रमांक एक ,दोन ,तीन ही जबाबदारीची कामे दिली जावी अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे आपणाकडे करण्यात येत आहे. तरी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही होण्यास निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी भुसावळ पूर्व विभाग सोसायटीचे संचालक तथा समन्वय समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस नेमाडे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदा पाटील, समन्वयक डॉ. मिलिंद बागुल , उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *