1 min read

क्षयरोग रुग्णांना सकस आहार किराणा किट वाटप

Loading

क्षयरोग रुग्णांना सकस आहार किराणा किट वाटप

जोगेश्वरी पूर्व येथील गांधी नगर आरोग्य केंद्रातील १० क्षयरोग रुग्णांना नुकतेच दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजी सकस आहार किराणा किट देण्यात आले.जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी जानेवारी महिन्यात त्यांच्या पन्नासाव्या वाढ दिवसानिमित्त येथील पाच क्षयरोग रुग्णांना किरण किट देऊन या मोहिमेला सुरुवात करून समाजातील दानशूर आणि सामाजिक जाणीव ठेऊन कार्य करणाऱ्या मान्यवरांना येथील रुग्णांना मदत करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार आज मुंबईतील आदर्श शिक्षिका ऋता रानडे आणि आदर्श सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत सालम यांच्या वतीने जोगेश्वरी पूर्व येथील दहा रुग्णांना स्वखर्चाने सकस आहार किराणा किट देण्यात आले. मे महिन्यात अजून दहा रुग्णांना सरोज शिंपी आणि पश्चिम रेल्वेचे मोटरमन सावंत यांच्या वतीने किट वाटण्यात येणार आहे.दर महिन्यात पाच ते दहा रुग्णांना हे सामान वितरीत करण्यात येणार आहे.एप्रिल महिन्यातील किट वितरीत करण्यासाठी येथील आरोग्य केंद्रप्रमुख डॉ अंजली चमोली, छाया दर्वेश, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सावंत, गणेश हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते.येथे जवळपास शंभरहून अधिक क्षयरोग रुग्णांची ट्रीटमेंट सुरू असून अजूनही ज्यांना या मोहिमेत सहभागी होऊन रुग्णांना मदत करायची असेल त्यांनी ९९२०५८१८७८ संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *