1 min read

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाची निवड बेकायदेशीर,धर्मादाय आयुक्तांचा निर्णय…

Loading

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाची निवड बेकायदेशीर,धर्मादाय आयुक्तांचा निर्णय…

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ या संस्थेच्या सन 2022 ते 2025 या कार्यकाळ करिता कार्यकारी मंडळाचा दाखल केलेला फेर फार अर्ज क्रमांक २५१/२०२२ धर्मदाय उपायुक्त एम डी गाडे जळगाव विभाग जळगाव यांनी दि ४ एप्रिल रोजी फेटाळला तसेच महाराष्ट्र विश्वस्त कायदा कलम ४१ अ अनव्य संस्थेचे नवीन कार्यकारी मंडळ निवडण्याचे निर्देश त्यांचे स्वतःच्या ऐच्छिक अधिकारात दिले. त्यानुसार सध्या कार्यरत असलेल्या संस्थेच्या संचालक मंडळास पुढील वैध असे कार्यकारी मंडळ निवडून येई पर्यंत परस्पर धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. त्यासाठी धर्मदाय उपायुक्त यांची पूर्व परवानगी घेण्याचे आदेश केले आहेत. तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक तीन महिन्याचे आत घेण्यात यावी तसेच मागील कार्यकारी मंडळाच्या व्यवहाराची व निर्णयाची चौकशी करण्याचे आदेश केले असून त्यासाठी सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयातील निरीक्षकांना चौकशी करण्याचे आदेशीत केलेले आहे.
धर्मदाय उपायुक्त जळगाव यांच्या आदेशामुळे सध्या कार्यरत असलेल्या संचालक मंडळ व पदाधिकाऱयांना मर्यादा घालून दिलेल्या आहेत.
खा शी मंडळ अमळनेर चा फेरफार फेटाळनेत आला असून ते कार्यकारी मंडळ अवैद्य घोषित करण्यात आले. सदर प्रकरणात उमेश साळूके ,डॉ बी एस पाटील , हेमंत पवार,,दिलीप जैन यांनी न्यायालयासमोर विश्वस्त मंडळाच्या बेकायदेशीर बाबी उघड केल्यामुळे ऐतिहासिक व राष्ट्रीय पुरुषांची पाश्वभूमी असलेल्या तसेच पूज्य प्रताप शेटजी व साने गुरुजी यांच्या आत्म्यास शांतता लाभण्याचे दृष्टीने धन दांडग्या संचालक मंडळाचे पितळ उघड केले. या कामी ऍडव्होकेट जी.एम.पाटील यांनी बाजू खम्बीर पणे मांडली।.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *