1 min read

सम्राट अशोक विद्यालयात होळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती.

Loading

सम्राट अशोक विद्यालयात होळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती.

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) – आपल्या राज्यात आता मतदान जवळ इला तर त्या वेळेक सगळ्यांनी आपला मतदान करू दीव रे महाराजा. म्हाताऱ्या कोताऱ्यांनी ,जनका अठरा वर्षे पूर्ण झाली तेंनी आपली मता योग्य उमेदवाराक दीव दे रे महाराजा. विद्यार्थ्यांका चांगलो अभ्यास करण्याची आणि चांगलो वागण्याची बुद्धी दीव दे रे महाराजा. अशाप्रकारे होळी मातेला कल्याण पूर्व च्या सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मालवणी भाषेत गाऱ्हाणे गायले. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून होळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. तसेच होळी खेळताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका. नैसर्गिक रंगांचा वापर करा. पर्यावरण प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या. असाही सल्ला दिला. कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम व त्यांचे सहकारी यांनी अचानक शाळेला भेट देऊन कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.शाळेचे सहशिक्षक रामदास बोराडे, संतोष कदम, योगेश झापडे व संतोष जाधव या शिक्षकांनी होळी तयार केली. तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी होळी पेटवून एकमेकांना रंग लावून होळीचा आनंद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *