1 min read

मारवड महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन

Loading

मारवड महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी
कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन विभागांतर्गत आज दिनांक. 30 मार्च 2024 वार शनिवार रोजी करिअर मार्गदर्शन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा विभाग समन्वयक प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी केले. त्यांनी राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षा तसेच राष्ट्रीय भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. सदर राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेत तीस तर राष्ट्रीय भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेत तीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी “करीअर मार्गदर्शन”या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात परिश्रम,सत्यता व वेळेचे नियोजन केल्यास उज्वल यश संपादन करू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असतांना विद्यार्थ्यांनी वाचनावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. एमपीएससी व यूपीएससी परीक्षांचा अभ्यासक्रम व चालू घडामोडी यावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. नोकरीचा शोध घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर देखील भर दिला पाहिजे. टायपिंग, ब्युटी पार्लर, शिलाई, बचत गटाच्या माध्यमातून आपला स्वतःचा व्यवसाय निर्माण करून रोजगार निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. कौशल्य विकासातून स्वयंरोजगाराकडे विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असा मोलाचा संदेश त्यांनी या कार्यक्रमा प्रसंगी दिला.
राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षा तसेच राष्ट्रीय भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेविषेत उज्वल यश संपादन केलेल्या व सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभा प्रसंगी द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी नाजमिनबी मेहमुदखान पठाण हिने महाविद्यालयीन जीवनात स्पर्धा परीक्षांचे महत्त्व याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ.नंदा कंधारे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. डॉ. माधव वाघमारे, प्रा .डॉ. दिलीप कदम,प्रा.डॉ. जितेंद्र माळी,प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा.डॉ. पवन पाटील,प्रा. विजयकुमार पाटील प्रा. किशोर पाटील तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *