1 min read

पुण्यात हिंजवडी हिल्स दत्तवाडी,मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा.

Loading

पुण्यात हिंजवडी हिल्स दत्तवाडी,मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा.*
पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
हिंजवडी हिल्स फेस:-2 मधील नव्याने स्थापन झालेल्या हिंजवडी हिल्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती कडून होळीच्या सणाचे, नव्याने निर्माण केलेल्या न्यू सेंट्रल पार्क गार्डन मध्ये आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम सेंट्रल पार्क जवळ असणाऱ्या महादेव मंदिरात आरती करण्यात आली,त्यानंतर होळीचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले, होळीच्या सणासाठी सोसायटीतील सर्व रहिवाशांचा मोठा उत्साह दिसून आला.होळीच्या पारंपारिक सणाची परंपरा कायम ठेवून,आयोजक आणि रहिवाशांनी वेगवेगळ्या पारंपारिक खेळा आणि घोषणा देऊन कार्यक्रमाचा आनंद वाढवला.लहान मुलांनी आणि महिलांनी होळी भोवती गोल राऊंड घेऊन होळीला मानवंदना देऊन आपला सहभाग दर्शविला.
अशा मोठ्या आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात होळी हा सण हिंजवडी हिल्स फेस:-2 मध्ये साजरा करण्यात आला.

हिंजवडी हिल्स फेस:-2 उत्सव आणि सांस्कृतिक कमिटीने यापुढेही अशाच पारंपारिक सणांचे आयोजन करून सोसायटीतील वातावरण उत्साही आणि आनंद राहील यासाठी वेगळे सणांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *