1 min read

“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न”

Loading

“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न”

पदवी प्रदान समारंभ खरं तर फक्त शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्यानंतर केला जातो. पण पुर्व प्राथमिकचा हा छोटा बालवर्ग पूर्व प्राथमिक मधून प्राथमिकमध्ये पदार्पण करीत असताना त्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अभिनव उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात आला.

यावेळी एकूण १०३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका प्राचार्य नीरज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महत्त्व वर्गशिक्षिका मंगला चौधरी यांनी मांडले. आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे व पालकांचे देवयानी पाटील यांनीआभार मानले. सूत्र संचालन ज्योत्स्ना पाटील आणि महिमा भदाने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *