अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे दप्तराविना शनिवारची शाळा…
![]()

अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे दप्तराविना शनिवारची शाळा…
जळगांव प्रतिनिधी
अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे दप्तराविना शनिवार या उपक्रमांतर्गत इ.५वी च्या वर्ग शिक्षिका श्रीमती. स्नेहल प्रकाश ठाकूर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी वाईट विचारांची होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा, वाढलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला तसेच होळी खेळताना नैसर्गिक व कोरड्या रंगाची होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला या उपक्रमात निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व राग द्वेष, मत्सर, व्यसन, हेवेदावे, टोमणे अशा अनेक दुर्गुणांचा नाश करून सर्वांशी प्रेमाने वागण्याची प्रतिज्ञा सुद्धा घेतली. याप्रसंगी अध्यापिका विद्यालयाच्या मा. प्राचार्य सौ.बेंडाळे मॅडम अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ललित नेमाडे सर आणि अभिनव विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.नरेंद्र चव्हाण तसेच इ. १ते ७चे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

