1 min read

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात नैसर्गिक रंग बनविण्याचे दिले प्रशिक्षण..

Loading

नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात हरित सेनेचे गोपाळ महाजन यांनी पाना फुलांपासून नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखविले .गुलाबाच्या पाकळ्या, बिट, पळसाचे फुलं, झेंडूची फुलं, जास्वंदीची फुलं, पालक यांपासून त्यांनी नैसर्गिक रंग बनवून दाखवले. बाजारात मिळणारे कृत्रिम काळ्या रंगात असलेल्या लेड ऑक्साईड मुळे मूत्र संस्थेचे कार्य बंद पडते व अध्ययन क्षमतेवर परिणाम होतो. हिरव्या रंगात असलेल्या कॉपर सल्फेट मुळे डोळ्यांना सूज येते व तात्पुरता आंधळेपणा येतो. सिल्वर रंगांमध्ये अल्युमिनियम ब्रॉमईड असते त्यामुळे कॅन्सर होण्याचे शक्यता असते. जांभळ्या रंगात क्रोमियम आयोडाईड असते त्यामुळे अस्थमाचे आजार व ऍलर्जीचे आजार होतात. त्यामुळे कृत्रिम रंग न खेळता घरच्या घरी नैसर्गिक रंग बनवावे असे गोपाळ महाजन यांनी सांगितले. प्रस्तावनेत अनिता पाटील यांनी आरोग्यासाठी असलेली नैसर्गिक रंगाची उपयुक्तता सांगितली. होळी हा सण आपापसातील दुरावा निर्माण करतो व आपल्या जीवनात आनंदाचे रंग भरतो असे अध्यक्ष स्थानावरून बोलताना पर्यवेक्षक श्री एल. जे.पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेमराज बऱ्हाटे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीयांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *