1 min read

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील चार ग्रामपंचायत सदस्य अपात्र…

Loading

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील चार ग्रामपंचायत सदस्य अपात्र…

अमळनेर प्रतिनिधी

ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत ही 15 जानेवारी 2021 ला घेण्यात आली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाकडे निवडणुकीत झालेला खर्च 30 दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक असल्याने सदर ग्रामपंचायत सदस्य यांनी खर्च निकाल जाहीर झाल्यापासून ती दिवसाच्या आत आपला खर्च सादर केला नव्हता अशी तक्रार येथील ग्रामपंचायत सदस्य दीपक काशिनाथ नंदवे यांनी वरिष्ठांकडे केली होती. त्या अनुषंगने कल्पनाबाई भाऊराव पाटील, सुदर्शन बाळासाहेब पवार, वेणूबाई पांडुरंग भील, सुरेखाबाई भिमराव पाटील या चार सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यात तक्रारदार व प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकले असता कल्पनाबाई भाऊराव पाटील यांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. सुदर्शन बाळासाहेब पवार यांनी 19/1/2022 रोजी खर्च सादर केला आहे. वेणूबाई पांडुरंग भील यांनी 25/1/2022 रोजी खर्च सादर केला आहे. सुरेखा भीमराव पाटील यांनी 25/1/2022 रोजी खर्च सादर केला आहे .परंतु कोविड 19 बाबत मार्गदर्शन सूचना या दिनांक 15 /3 /2020 ते 14/ 3 /2021 पावतो अमलात होत्या ग्रामपंचायत निवडणूक निकाल हा दिनांक 15 /1 /2019 रोजी घोषित करण्यात आला आहे .अंतिम निवडणूक खर्च सादर करण्यासाठी मुदत ही 19/ 2 /2021 पावतो होती सदर सदस्य यांनी या मुदतीत खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही म्हणून जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी अपात्र घोषित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *