1 min read

अमळनेर येथील होमिओपॅथिक महिला डॉक्टरांचा मेळावा संपन्न

Loading

अमळनेर येथील होमिओपॅथिक महिला डॉक्टरांचा मेळावा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर होमिओपॅथिक असोसिएशन द्वारा आंतर्राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथील होमिओपॅथिक महिला डॉक्टरांचा मेळावा आयोजित करण्यात आला. सदरहू कार्यक्रमाचे संयोजन असोसिएशनच्या उपाध्यक्षा आणि ब्लॉसम होमिओ क्लिनिकच्या डॉ. नीरजा माहेश्वरी यांनी केले.या प्रसंगी डॉ. मंजुश्री जैन,डॉ.अर्चना पारख,डॉ.मनीषा लाठी,डॉ.देवयानी बडगुजर,डॉ.स्नेहल पाटील,डॉ.चारुशीला महाजन,डॉ. दिपाली साळुंखे,डॉ.श्रद्धा चौटे,डॉ.दिपाली पाटील यांना त्यांनी केलेल्या सामाजिक सेवेबद्दल प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. तसेच लहान मुलांसाठी चित्र रंगवा स्पर्धा ही घेण्यात आली.सर्वांना बक्षिसे देऊन मुलांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. योगेश नेतकर,सचिव डॉ. डी.एम. पाटील व सर्व सभासदांनी सहकार्य केले.हा कार्यक्रम 17 मार्च 2024 रोजी रोटरी हॉल, अमळनेर येथे संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *