ऐतिहासिक बारामोटेची विहीर येथे सावित्रीमाईचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा
![]()

ऐतिहासिक बारामोटेची विहीर येथे सावित्रीमाईचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा
सातारा :जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या थोर क्रांतिकारक कार्याला उजाळा देण्याच्या सदउद्देशाने लिंब (शेरी) ता. जि. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील बारामोटांची विहिर येथे सावित्रीमाई फुले यांचा स्मृतिदिन, माहेर मेळावा, विविध क्षेत्रातील १५१ महिलांचा विशेष सन्मान व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पाहुण्यांचे आगमन, परिचय व उपस्थित महिला पुरुषांची नाव नोंदणी व स्वागत करण्यात आले. सावित्रीमाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जयसिंग लोखंडे अध्यक्ष सातारा जिल्हा माळी संघटना होते. प्रमुख उपस्थिती म्हणून सौ सुवर्णा नाळे सरपंच वाठार निंबाळकर, सौ सोनल कोद्रे संस्थापिका सावित्री सन्मान फौंडेशन पुणे, सौ.संगीता टिळेकर माजी सदस्य हवेली पंचायत समिती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकते संपतराव जाधव उपस्थित होते.
प्रास्ताविक अजित जाधव यांनी केले.कुमारी साक्षी जमदाडे कोरेगाव यांनी सावित्रीमाई यांच्या कार्याचा आढावा घेऊन उपस्थित महिला पुरुषांची मने जिंकली.उपस्थित महिलांच्या हस्ते बारामोटेची विहिरिस श्रीफल वाढवून गुणगौरव समारंभास शुभारंभ झाला. महिला मेळावा प्रसंगी महिलांनी फुगडी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविले.विविध क्षेत्रातील १५१ महिलांचा गौरवपत्र व फुले दाम्पत्य प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.
फुले दाम्पत्य यांच्या कृतीशी कार्यामुळे आज महिला विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठवीत आहेत.सुजन फौंडेशन संस्थेच्या महात्मा फुले विचार अभियान या उपक्रमात सौ सुवर्णा नंदकुमार नाळे सरपंच वाठार निंबाळकर ता फलटण यांना यांच्या उद्योजक व लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व सौ सोनल कोद्रे संस्थापिका सावित्री सन्मान फौंडेशन हडपसर पुणे यांच्या महिला प्रबोधन,सक्षमीकरण व विविध उपक्रमशील कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले स्मृती पुरस्कार २०२४ ने शाल, स्मृतिचिन्ह ,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्ताने कोरेगाव येथील श्री जयसिंग लोखंडे व सौ वर्षा लोखंडे यांनी आपल्या मुलांच लग्न सत्यशोधक पद्धतीने लावून समाजासमोर प्रेरणादायी दिशादर्शक कार्याबद्दल विषेश सन्मान करण्यात आला.
श्री विजय वरणेकर यांनी बारामोटेची विहीर याबाबतची सविस्तर माहिती उपस्थिताना दिली.कार्यक्रमा करिता सौ रुपाली नाळे, सौ वर्षा लोखंडे, मधुकर ननावरे,श्री राऊत, श्री सुनील रासकर,श्री प्रशांत शिंदे प्रकाश शिंदे, नारायण वर्णेकर, हणमंत वर्णेकर, राजेंद्र शिंदे, विजय वर्णेकर, खाशाबा वर्णेकर, विमल वर्णेकर, सुरेश शिंदे, भगवान वर्णेकर, पांडुरंग शिंदे, शैलेश शिंदे व लिंब शेरी येथील महिला ,पुरुष उपस्थित होते.कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री रवी शिंदे उपसरपंच लिंब तसेच क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान , लिंब शेरी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भीमराव नाळे यांनी केले .महात्मा फुले प्रतिष्ठानचे सूरज शिंदे यांनी उपस्थित फुलेंप्रेमींचे आभार मानले.

