नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे मानसिक आरोग्य यावर व्याख्यान संपन्न
![]()

नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे मानसिक आरोग्य यावर व्याख्यान कार्यक्रम संपन्न
अमळनेर
दिनांक 11 मार्च 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान अंतर्गत मानसिक आरोग्य यावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याते डॉ. जगदीश सोनवणे समाज कार्य महाविद्यालय अमळनेर हे होते. अध्यक्ष मा. प्रा.विजयकुमार वाघमारे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेचे पूजन व अभिवादन करुन करण्यात आले.तदनंतर स्वागत समारंभ झाले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ. जगदीश सोनवणे यांनी महिलांचे मानसिक आरोग्य विषयाबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये महिलांच्या मानसिक समस्या सामाजिक जडणघडण व आजार याबाबत चर्चा केली. व तसेच मानसिक आरोग्यावर विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार करून आणले. पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पी. एस. पाटील व मा. अभिजीत भांडारकर यांच्या मार्गदर्शना नुसार कार्यक्रम नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.अनिता खेडकर यांनी केले. तसेच प्रा.विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ.श्वेता वैद्य प्रा.डॉ.अस्मिता, प्रा. डॉ. भरत खंडागडे, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे प्रा. धनराज ढगे, प्रा. डॉ. सागर चव्हाण कार्यालयीन अधीक्षक अनिल वाणी, ज्योती सोनार मॅडम, महेश शेलार यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी मैराळे या विद्यार्थ्यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मोहिनी धनगर या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाची एकूण 75 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

