1 min read

शाळांमध्ये निवडणूक साक्षर मंडळ स्थापन करा-तहसीलदार रुपेश कुमार सुराणा

Loading

शाळांमध्ये निवडणूक साक्षर मंडळ स्थापन करा
तहसीलदार रुपेश कुमार सुराणा

अमळनेर नगरपरिषद येथील महात्मा फुले सभागृहामध्ये नोडल अधिकारी आढावा बैठक संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मतदान प्रक्रियेबाबत‌ जनजागृती व्हावी आणि सर्वच निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने जिल्ह्यात निवडणूक साक्षरता स्थापन करण्यासाठी
नववी ते बारावीचे विद्यार्थी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात. त्यांच्या शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब कार्यान्वित करावा असे अमळनेर येथील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नोडल अधिकारी आढावा बैठकीमध्ये अमळनेरला नगरपरिषदेच्या महात्मा फुले सभा हॉलमध्ये तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले
ते पुढे म्हणाले की शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी नोडल अधिकारी असून पाच विद्यार्थी सदस्य आहेत. कॉलेजमध्ये प्राध्यापक किंवा प्राध्यापकेतर कर्मचाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी त्यात ते पाच विद्यार्थी सदस्य आहेत. जेथे शाळा किंवा महाविद्यालये नाहीत, अशा झोपडपट्टी, वाड्या आणि वस्त्यांवर निरक्षर किंवा अल्पशिक्षित मतदारांसाठी चुनावी पाठशाला हा उपक्रम सुरू केला आहे. तेथे बीएलओ (बुथ लेवल ऑफिसर) हाच नोडल अधिकारी असून त्या-त्या परिसरातील पाच व्यक्तींना सदस्य म्हणून निवडण्यात आले आहेत. तर विविध कार्यालये, धार्मिक संस्था, सामाजिक संस्था व तत्सम सर्वच ठिकाणी मतदार जनजागृती फोरमची स्थापना करण्यात आली असून तेथील प्रमुखांना नोडल अधिकारी नेमले आहे. जास्तीत जास्त मतदार जनजागृती होणे गरजेचे आहे आपल्या शाळेत साक्षर मंडळ स्थापन करणे, बैठका घेणे, कार्यक्रम विविध स्पर्धांचे आयोजन करणे.. मतदार यादीत 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीचे नोंदणी करणे त्यासाठी स्वतंत्र प्रोसिडिंग ठेवणे क्रम प्राप्त आहे असेही त्यांनी सांगितले.. येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांनी सज्ज असावे असे सांगत शिक्षकच प्रामाणिकपणे निवडणुकीची प्रक्रिया पार पाडू शकतो असे सांगितले..
व्यासपीठावर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, नायब तहसीलदार प्रशांत धनके व लिपिक नितीन ढोकणे उपस्थित होते
सदर मिटींगला अमळनेर तालुक्यातील सर्व विद्यालयाचे 79 नोडल अधिकारी या बैठकीला उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *