1 min read

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण पहिला टप्पा उत्साहात संपन्न

Loading

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण पहिला टप्पा उत्साहात संपन्न

दिनांक ४,५ व ६ मार्च २०२४ या कालावधीत
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
२०२० अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे मार्फतभडगाव
गटशिक्षणाधिकारी श्री गणेश आण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी फार्मसी कॉलेज, चाळीसगाव रोड भडगाव येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणचा पहिला टप्पा उत्साहात यशस्वीरीत्या संपन्न झाला. विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले गेले पाहिजे, सामाजिक मूल्ये, पर्यावरण पूरक, व्यावसायिक शिक्षण दिले गेले पाहिजे, यासाठी शिक्षकांना नवनवीन तंत्रज्ञान शिकविण्यात आले. तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन श्री.अश्विन पाटील सर यांनी केले.
या प्रशिक्षण वर्गास प्रा एम पी पवार, श्री नितीन पाटील, श्री व्ही एस पाटील, श्री अश्विन पाटील, श्री राकेश पाटील यांनी सुलभक म्हणून अतिशय सुंदर रित्या प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षण वर्गास भडगाव तालुक्यातील इ ९ वी १० वी ला शिकविणारे जवळपास १५० शिक्षक बंधु भगिनी उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे प्रशिक्षण संपन्न झाले. तसेच प्रशिक्षण वर्गामध्ये तीनही दिवस माध्यमिक विद्यालय शिंदी शाळेचे श्री.अश्विन पाटील सर यांनी पुर्ण वेळ तंत्रस्नेही म्हणून काम सांभाळले.
सदर प्रशिक्षण वर्गास १२ प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले होते. त्यात ८ प्रशिक्षक हे किसान परिवारातील होते तरी या सर्व प्रशिक्षकांचे संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरि पाटील, उपाध्यक्षा डॉ सौ पुनम ताई पाटील व सचिव दादासाहेब प्रशांत विनायक पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *