पक्षाने संधी व शिक्षकांनी साथ दिल्यास मुंबईतील शाळा कॉलेज समृद्ध करणार- अनिल बोरनारे
![]()
पक्षाने संधी व शिक्षकांनी साथ दिल्यास मुंबईतील शाळा कॉलेज समृद्ध करणार- अनिल बोरनारे
मुंबईतील शाळांना १ ते ५ कोटींचा निधी आणणार – अनिल बोरनारे

मुंबई (प्रतिनिधी) मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाने संधी दिल्यास निवडून येऊन विविध योजनांच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक शाळा व महाविद्यालये समृद्ध करणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी केले.
यासाठी मुंबईतील प्रत्येक शाळेसाठी १ ते ५ कोटीचा निधी आणणार असल्याचेही बोरनारे यांनी सांगितले.
मुंबईतील वझे केळकर कॉलेज, सोमय्या कॉलेज व इतर शाळांमध्ये सुरू असलेल्या शिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गांना अनिल बोरनारे यांनी भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधला. मुंबईतील अनुदानित मराठी हिंदी उर्दू व इतर भाषिक शाळा विद्यार्थ्यांच्या अभावी बंद पडत असून दुसरीकडे मात्र सेल्फ फायनान्स शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाहीत असा विरोधाभास दिसत आहे यावर उपाय म्हणून अनुदानित शाळांना अद्ययावत करण्याची गरज असून आपल्याकडे यासाठी एक योजना असल्याचे बोरनारे यांनी सांगितले. २४ वर्षांपासून हजारो शिक्षकांचे प्रश्न आपण सोडविले असून याबाबत मुंबईसह राज्यातील शिक्षक व शाळांच्या विकासासाठी लवकरच ब्ल्यू प्रिंट ठेवणार असून प्रत्येक शाळा व महाविद्यालये अद्ययावत करू असा विश्वास त्यांनी शिक्षकांना दिला.

