1 min read

प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

Loading

प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

संगणकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी दि. २८ व २९ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील आय.एम.आर इन्स्टिट्युट तर्फे झालेल्या २५ व्या आयटी फेस्टा स्पर्धेत सुयश मिळवले.
तृतीय वर्ष संगणकशास्त्र वर्गातील कु. ललित मधुकर चौधरी ह्यास तृतीय पारितोषिक मिळाले. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. सदर स्पर्धेत महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील, ललित चौधरी, जान्हवी सोनार, नेहा अहिरराव, मानसी खैरनार, जान्हवी भावसार, भाग्यश्री पाटील, संदेश पाटील, हेमंत बच्छाव, सागर बाविस्कर, चैतन्य कोळी, जयेश सोनवणे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व स्पर्धेतील शेवटच्या फेरीपर्यंत मजल मारीत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. या कामगिरीबद्दल खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. एच. निकुंभ, प्रा. डॉ. जे. बी पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे, आयक्युएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे यांनी विजयी विद्यार्थ्यांसह संगणकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व सहकारी प्राध्यापकांचे कौतुक केले. सर्व स्पर्धकांना विभागप्रमुख प्रा. पुष्पा पाटील, प्रा. अमित शिंदे, प्रा. नेहा आगलावे, प्रा. किरण बोरसे, प्रा. रुपाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *