1 min read

अमळनेरच्या सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन

Loading

अमळनेरच्या सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन

अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या पार्श्वभूमीवर शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. विज्ञानासोबतच गणित, इतिहास, भूगोल या विषयातील मांडलेल्या उपकरणांनी उपस्थिताचे लक्ष वेधले. या विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी उपकरणांची मांडणी केली होती. विद्यालयाच्या प्राचार्या गायत्री भदाणे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत, डी बी वाल्हे, विज्ञान शिक्षक एन बी खंडारे, जी पी हडपे, उमेश काटे, दीपककुमार पाटील, नीलिमा पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपककुमार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्मार्ट सिटी, सेंद्रिय शेती, ज्वालामुखी, भूकंप लहरी, सूर्यमाला आदींसह विविध उपकरणांची मांडणी केली होती. दरम्यान शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनात आठवीची विद्यार्थिनी पल्लवी मोरे व इच्छा झाल्टे यांच्या “स्मार्ट सिटी” उपकरणाला प्रथम, सातवीची विद्यार्थिनी देवयानी पाटील हिच्या “ज्वालामुखी” या उपकरणाला द्वितीय तर नववीची विद्यार्थिनी मानसी चव्हाण हिच्या उपकरणाचा तृतीय क्रमांक आला.यावेळी परीक्षक म्हणून उमेश काटे व जी पी हडपे यांनी काम पाहिले. दिलीप मनोरे, प्रवीण उशीर, सुरेश पाटील आदींनी सहकार्य केले.

अमळनेर- विज्ञान प्रदर्शनाची पाहणी करताना प्राचार्य गायत्री भदाणे व उपस्थित मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *