1 min read

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विकास निधीतून रायगड जिल्ह्यातील शाळांना ई. लर्निग शैक्षणिक साहित्य वाटप.

Loading

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विकास निधितून रायगड जिल्ह्यातील शाळांना ई. लर्निग शैक्षणिक साहित्य वाटप.

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा स्थानिक आमदार विकास निधी कार्यक्रम अंतर्गत रायगड जिल्हातील 7 तालुक्यातील 88 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
दिनांक 29.02.2024 रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा आमदार स्थानिक आमदार विकास निधी कार्यक्रम अंतर्गत रायगड जिल्हातील 7 तालुक्यातील 88 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, यामध्ये प्रोजेक्टर, प्रोजेक्टर स्क्रीन, ट्रायपॉड स्टेण्ट, स्पीकर, माईक, माऊस आणि महाराष्ट्र राज्याचा अभ्यासक्रम या शैक्षणिक साहित्याचे (E-learning equipment) चे वाटप पनवेल चे लोकप्रिय आमदार मा. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी रविंद्र पाटील, संजय भगत , डाकी, जगदीश म्हसे, संतोष कामंरी , कदम , रोशन तांडेल, पाटोळे , काझी सर आणि अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर बांधव उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *