1 min read

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा,पदार्थविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा उपक्रम

Loading

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा,पदार्थविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा उपक्रम

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून २८ फेब्रुवारी रोजी पदार्थविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.

पदार्थविज्ञान विभागाद्वारे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने प्रात्यक्षिकांच्या स्वरूपात प्रदर्शन आयोजित करण्यात आले. स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय इंग्रजी माध्यमिक शाळेतील जवळपास पन्नास विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला. अभ्यासातील विज्ञानाच्या सिद्धांतांचा प्रात्यक्षिक स्वरूपातील अभ्यासाचा विद्यार्थिनींनी अनुभव घेतला. सदर विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे शिक्षक श्रीमती जागृती पाटील व दिनेश शेळकर यांनी देखील सहभाग नोंदवला. नोबेल पुरस्कार (१९३०) विजेते सर सी व्ही रमण यांच्या नावाने भारत सरकार तर्फे सन १९८७ पासून सदर विज्ञान दिन साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील पदवी- पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयंत पटवर्धन व त्यांचे सहकारी प्रा. डॉ. अमित पाटील, प्रा. डॉ. एच. डी. बागूल, प्रा. नितेश कोचे, प्रा. डॉ. प्रियंका पाटील, प्रा. संदीप नेरकर, प्रा. डॉ. चित्रा मल्लेला, प्रा. आकाश चौधरी, प्रा. उमेश जाधव, तसेच विभागातील कर्मचारी पवन शर्मा, अंबादास चावरिया, विश्वास पाटील, संभाजी सैंदाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे आयोजन

प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागात राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने पोस्टर सादरीकरणाची स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक प्रा. एस. ए. जोशी उपस्थित होते. “प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा त्या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी. त्यासाठी वाचन, चिंतन आणि निरीक्षणाची गरज असते. म्हणून त्याकरिता विज्ञानाची कास धरली पाहिजे.”असे त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला व कार्यक्रमाविषयी उत्स्फूर्तपणे अभिप्राय व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. कल्याणी पाटील, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. पूजा भदाणे व मंगला पाडवी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *