साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या अंतर्बाह्य या कविता संग्रहासाठी शिवांजली साहित्य पुरस्काराने सन्मानित
![]()
साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या अंतर्बाह्य या कवितासंग्रहासाठी
शिवांजली साहित्य पुरस्काराने सन्मानित


अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी-पिंपळवंडी ता . जुन्नर जि. पुणे येथे ३१ वा शिवांजली साहित्य महोत्सवात डॉ. श्रीपाल सबनीस ज्येष्ठ विचारवंत आणि ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे शुभहस्ते, शिवांजली साहित्यपीठाचे अध्यक्ष शिवाजीराव चाळक, मुक्त सृजन साहित्य चळवळीचे जनक डॉ. महेश खरात यांचे उपस्थितीत शिवांजली साहित्य सन्मान श्री. दत्तात्रय वडगावकर पुरस्कृत २०२४ या पुरस्काराने अंतर्बाह्य गितेश शिंदे प्रकाशक सृजन संवाद मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहासाठी २६ फेब्रुवारीला मला सन्मानित केले गेले याचा अपूर्व आनंद तर आहेच. हे पुरस्कार निरपेक्षपणे परिक्षण करून प्रदान होतात. आणि या महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी कुठलेही मानधन न घेता या परिवाराच्या या महोत्सवात सामिल होतात. शासनाच्या कुठल्याही वित्तीय अनुदानाची अपेक्षा न ठेवता ही साहित्य संवर्धनासाठी ही चळवळ ३१वर्षे ग्रामीण भागात सुरू आहे. ही बाब लक्षवेधी आणि अभिनंदनीय आहे. गावोगावी अशी जिव्हाळ्याची स्नेह साहित्य संमेलने भरवून साहित्य लेखन/वाचन चळवळ या मराठी भाषिकांच्या राज्यात जर राबवली गेली तर साहित्य प्रवाह निर्मळ होऊन प्रवाहीत होतील.आणि माणसे जोडणारी साहित्य संस्कृती संवर्धीत होईल. यात शंकाच नाही. दरवर्षी या साहित्य महोत्सवात कुठलीही अपेक्षा न ठेवता. पुन्हा पुन्हा जावे. ही भावना या महोत्सवात आलेल्या प्रत्येकाची होते. हीच कवीवर्य सन्मित्र यांच्या चळवळीच्या यशाची पावती आहे. श्री.शिवाजीराव चाळकांचे या यशासाठी अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
त्यांचे साहित्य शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे…

