1 min read

शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Loading

शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

लोकप्रिय शिक्षक आमदार,ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रकृती अस्वस्थ्य असूनही शिक्षकांचा समस्यांसाठी सोडवण्यासाठी डायरेक्ट मत्रालयात दाखल .
ठाणे( मनिलाल शिंपी) कोकण विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, यांच्या नेतृत्वाखाली, चिकाटीने प्रकृती चांगली नसताना ही शिक्षकांच्या टप्पा वाढ व इतर समस्याची जाणीव लक्षात ठेऊन अगोदर आमच्याशी मारिन ड्राइव्ह येथे 1 तास चर्चा केली व त्यानंतर मुख्यमंत्री साहेब यांचे लोकेशन घेऊन तात्काळ मुख्यमंत्री साहेब यांची आज रात्री 8.30 वाजता मंत्रालयात भेट घेतली,वाढीव टप्पा व इतर प्रश्न मांडले व बैठक लावण्यास विनंती केली,
त्यावर मुख्यमंत्री साहेब असे म्हटले कि, हा प्रश्न मला माहित आहे बैठकी पेक्षा तुमचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे, तुमचा प्रश्न मी सोडविणार च, मी शिक्षण मंत्री व अर्थ मंत्री यांच्या सी चर्चा करतो याच बरोबर शिक्षकांच्या पेन्शन चा पण मुद्दा मी सोडवितो,असे ठाम पणे सांगतिले.यावेळी पुंडलिक रहाटे, रंगारी सर, जामनिक सर उपस्थित होते,खंडेराव जगदाळे यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *