1 min read

प्रतापच्या अमय कोळीची चमकदार कामगिरी

Loading

प्रतापच्या अमय कोळीची चमकदार कामगिरी

अमळनेर : येथील प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचा क्रिकेट कर्णधार अमय रविंद्र कोळी याने वेस्ट झोन आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सौराष्ट्र विद्यापीठ संघांचे चार फलंदाज बाद करून उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक मिळविले आणि आपला क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला अमय प्रताप महाविद्यालय चा कॅप्टन असून एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे
ही स्पर्धा १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात घेण्यात आले होते. चार राज्यातील विद्यापीठातील क्रिकेट संघ यात सहभागी होते..
या यशाबद्दल खा. शि. मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व मा.संचालक मंडळ, संस्थेचे सचिव व प्राचार्य प्रा. डॉ. अरुण जैन, सहसचिव प्रा. डॉ. धीरज वैष्णव, सर्व मा.उप प्राचार्य, डॉ.संदीप नेरकर (जिमखाना प्रमुख ), डॉ. मुकेश भोळे (आयक्युएसी समन्वयक), प्रा. डॉ. सचिन पाटील (वरिष्ठ विभाग क्रीडा प्रमुख ), प्रा. अमृत अग्रवाल (क्रीडा संचालक कनिष्ठ विभाग ), प्रा. अर्चना पाटील(योग व क्रीडा शिक्षिका ), प्रशांत देवकाते, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अमयचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *